Homeज्योतिष शास्त्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या आणि दसऱ्याला विजयाचे सिमोल्लंघन साजरे करा
ज्योतिष शास्त्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या आणि दसऱ्याला विजयाचे सिमोल्लंघन साजरे करा
ज्योतिष शास्त्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या आणि दसऱ्याला विजयाचे सिमोल्लंघन साजरे कराज्योतिष शास्त्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या आणि दसऱ्याला विजयाचे सिमोल्लंघन साजरे करा

ज्योतिष शास्त्रावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या आणि दसऱ्याला विजयाचे सिमोल्लंघन साजरे करा

 
₹21
Start Date:
Oct 24, 2023 4:30 AM
End Date:
Oct 24, 2023 6:30 AM
Venue:
This is a virtual event. The link to join the event will be shared with you.
Product Description


युग स्पर्धेचं आहे. त्यामुळे क्षेत्र कोणतेही असू द्या, स्पर्धा ही करावीच लागते. स्पर्धा असेल तरच मनुष्य स्वतःला सिद्ध करू शकतो. निखळ, निर्मळ आणि प्रामाणिक स्पर्धा केली तर आपण कुठे आहोत, आपल्यात कोणत्या गोष्टींची उणीव आहे. आपली कोणती बाजू भक्कम आहे. आपल्याला सर्वोत्तम सिद्ध करण्यासाठी आणखी काय करावे लागेल,याची जाणीव होते. याच उदात्त हेतूने आम्ही म्हणजे जळगावच्या ज्योतिष संशोधन केंद्राच्या वतीने अॅस्टोगुरू डॉ. ज्योतिष जोशी गुरूमॉ घेऊन आल्या आहेत. ज्योतिष क्षेत्रातील अभ्यासक, ज्योतिष व्यावसायिक आणि या क्षेत्राची आवड असणार्‍यांसाठी एक भव्य ऑनलाईन ज्योतिष ज्ञानदीप स्पर्धा.


साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजयादशमीच्या दिवशी, म्हणजे 24 ऑक्टोबर 2024 रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.


स्पर्धा, नियम, अटी आणि बक्षिसांचा वर्षाव

ही एक वेळ निर्धारित स्पर्धा असेल

ज्योतिष शास्त्रावर आधारित 25 प्रश्न आपल्याला दिले जातील. त्याची उत्तरे 12 मिनिटात द्यायची आहेत.

प्रत्येक प्रश्नाला तीन पर्याय असतील. त्यातून योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे.

स्पर्धा मराठी भाषेत आणि महाराष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ति राज्यभरातून भाग घेऊ शकते.

स्पर्धेआधी दोन वेळा ऑनलाइन ट्रायल टेस्ट घेण्यात येईल.

स्पर्धा सहभाग घेण्यासाठी नाममात्र नोंदणी फी फक्त 21 रुपये ठेवण्यात आली आहे.

फी नाममात्र असली तरी बक्षिसे मात्र भरगच्च ठेवण्यात आली आहेत. कारण स्पर्धेचा हेतू फक्त आपल्याला आपला अभ्यास तपासता यावा, एवढाच आहे.


बक्षिसे काय असतील..

या स्पर्धेतील विजेत्यांना ज्योतिष अभ्यासकांनी स्वागत केलेल्या आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या डॉ. ज्योती जोशी लिखित ज्योतिष शास्त्राच्या पुस्तकांचा खजिना आणि रोख रक्कम मिळणार आहे.


प्रथम बक्षिस अकरा पुस्तके आणि 8000 रुपये रोख.

दुसरे बक्षिस आठ पुस्तके आणि 5000 रुपये रोख.

तिसरे बक्षिस पाच पुस्तके आणि 3000 रुपये रोख

पाच जणांना प्रत्येकी पाच पुस्तके उत्तेजनार्थ बक्षिसे म्हणुन देण्यात येणार आहेत.


इथे करता येईल नोंदणी

आपल्या ज्ञानाचे सिमोल्लंघन करण्यासाठी जास्तीत जास्त ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक, ज्योतिष व्यावसायिक, ज्योतिष प्रेमी यांनी सहभाग नोंदवावा. नोंदणी करण्यासाठी आपण आपले संपूर्ण नाव , पत्ता, फोन नंबरसह प्रवेश फी भरावी. त्यानंतर आपणास ट्रायल टेस्ट आणि प्रत्यक्ष स्पर्धेत सहभागी होता येईल.


चला तर आता वेळ घालवू नका. अभ्यास करा आणि नोंदणी करा.


धन्यवाद,

शुभम भवतु,

जय ज्योतिष

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now